मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बीडीडी चाळीचा पुनर्विकास 36 महिन्यात, भूमीपूजन कार्यक्रमात आव्हाडांचं आश्वासन, जागवल्या महापुरुषांच्या आठवणी

बीडीडी चाळीचा पुनर्विकास 36 महिन्यात, भूमीपूजन कार्यक्रमात आव्हाडांचं आश्वासन, जागवल्या महापुरुषांच्या आठवणी

 मुंबईत (Mumbai) बीडीडी चाळीच्या (BDD Chawl) पुनर्विकासाचं (redevelopment) काम केवळ 36 महिन्यात (36 months) पूर्ण होईल आणि इथल्या मूळ रहिवाशांना नव्या घरांची चावी मिळेल, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 ऑगस्ट : मुंबईत (Mumbai) बीडीडी चाळीच्या (BDD Chawl) पुनर्विकासाचं (redevelopment) काम केवळ 36 महिन्यात (36 months) पूर्ण होईल आणि इथल्या मूळ रहिवाशांना नव्या घरांची चावी मिळेल, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं. बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक थोर पुरुषांच्या आठवणी जागवल्या, तर आव्हाडांनी पवार आणि ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली.

काय म्हणाले आव्हाड?

आपण आदित्य ठाकरेंच्या सोबतीनं पुनर्विकासाचं काम करत असल्याचं सांगताना पुढच्या 36 महिन्यात नागरिकांच्या हाती नव्या घरांच्या चाव्या असतील, असा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अनेक साहित्यिक बीडीडी चाळीत होऊन गेले असं सांगताना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी सांगितल्या.

गेल्या 25 वर्षापासून बीडीडीच्या विकासाचा प्रश्न रखडला असून आपण एकेक प्रश्न मार्गी लावत असल्याचं ते म्हणाले. 2010 पर्यंत सेवेत भरती झालेल्या पोलिसांना घरं देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व असताना कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असं सांगत बीडीडीतील घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रमदेखील पवार आणि ठाकरेंच्याच हस्ते पार पडेल, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा -

शरद पवारांनी जागवल्या आठवणी

बीडीडी चाळीला मोठा इतिहास असून अनेक महापुरुष या चाळीत मोठे झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य या बीडीडी चाळीत होतं. प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे, कॉम्रेड अमर शेख यांचं वास्तव्यही बीडीडी चाळीत असल्याचं सांगत पवारांनी इतिहासातील आठवणी जागवल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्तुती करत महापुराच्या संकटातून बाहेर पडण्याची हिंमत त्यांनी दाखवल्याचं पवार म्हणाले. या परिसरानं ब्रिटीशांना कष्टकऱ्यांची ताकद दाखवल्यामुळं हा दिवस ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

First published:

Tags: Jitendra awhad, Mumbai, Sharad Pawar (Politician), Uddhav Thackeray (Politician)