मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार-रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू

मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार-रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू

या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

  • Share this:

22 डिसेंबर : नाताळ आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे थर्टीफर्स्टच्या जल्लोषासाठी मोठ-मोठ्या हॅाटेलपासून ते ढाब्यापर्यंत सर्वत्र लगबग सुरू आहे. मद्यप्रेमींनीही आतापासूनच पार्टीचं आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. गृह खात्याने दिलासा देत  मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिलीये. तसंच  या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 04:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading