Home /News /mumbai /

Bappi Lahiri : मुंबई पोलिसांनी अनोख्या पद्धतीने बप्पी दांना वाहिली श्रद्धांजली, पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

Bappi Lahiri : मुंबई पोलिसांनी अनोख्या पद्धतीने बप्पी दांना वाहिली श्रद्धांजली, पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

संगीतकार, गायक म्हणून ते जितके लोकप्रिय होते, तितकेच ते वैशिष्टपूर्ण पेहेरावासाठीही ओळखले जातं.

    मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeskar) यांच्या निधनानंतर बॉलिवूडला अजून एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) (वय 69) (Musician And Singer Bappi Lahiri Demise) यांचे बुधवारी निधन झाले. 80 आणि 90 च्या दशकांत त्यांचे संगीत आणि गाणी विशेष लोकप्रिय ठरली. वैशिष्टयपूर्ण संगीताच्या माध्यमातून ते सर्व पिढ्यांशी जोडले गेले होते. 'डिस्को डान्सर', 'चलते-चलते', 'शराबी' ते अगदी 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'बागी 3' चित्रपटापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट संगीतबद्ध केले. संगीतकार, गायक म्हणून ते जितके लोकप्रिय होते, तितकेच ते वैशिष्टपूर्ण पेहेरावासाठीही ओळखले जातं. मुंबई पोलिसांनी बप्पी लहिरींना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली.. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बप्पी दा (Bappi Da) यांना ट्विटरवर श्रद्धांजली दिली. पोस्टमध्ये त्यांनी लोकप्रिय गाण्याचं शब्द लिहिले आदे, ज्यात त्यांनी लिहिलं,'यार बिना चैन कहां रे'. यासोबतच दोन हॅशटॅग #KingOfHearts #MusicOfGold चा वापर केला. पोस्टमध्ये 'यार बिना चैन कहां रे' या गाण्यात चैनऐवजी चेनचा फोटो टाकला आहे. सोन्याच्या दागिन्यांविषयी त्यांचं प्रेम प्रदर्शित करतं. त्यातं एक कॅप्शन दिलं आहे, बप्पी दा प्यार कभी कम नही होगा. मुंबई पोलीस आपल्या अनोख्या पद्धतीने विविध विषयांवर ट्वीट करतात. ट्रेंड करणाऱ्या विषयांवर ते ट्वीट करतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai police, Social media, Twitter

    पुढील बातम्या