कर्जमाफी होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

कर्जमाफी होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

" शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे" बॅनर ठिकठिकाणी झळकवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मात्र , या बॅनरवर राष्ट्रवादी आणि मनसेने खरपूस टीका केली आहे.

  • Share this:

06 जून : राज्यभरात  शेतकरी संपावर गेला आहे. कर्जमाफी मिळावी म्हणून ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा सुरू आहे. भाजपचे नेते  शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करत असतानाच डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भाजपच्या काही उतावळ्या पदाधिका-यांनी " शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे" बॅनर ठिकठिकाणी झळकवून  शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मात्र , या  बॅनरवर राष्ट्रवादी आणि मनसेने खरपूस टीका केली आहे.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते आणि शासनाच्या 21 सदस्यांची कमिटी स्थापन केली आहे. मात्र, कर्जमुक्ती  झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप सरकारने केली नाही. मात्र, असं असतानाही डोंबिवली परिसरात  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याबद्दल  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या  समर्थकांनी  बॅनरबाजी करून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे. इतकेच नाही तर  हमीभावाचा कायदा, वीजबिलात सवलत, गोदामाची सुविधा, दुधाची  दरवाढ असे निर्णय  घेतल्याबद्दलही  फडणवीस यांचे आभार  बॅनरच्या माध्यमातून  मानले आहे.

First Published: Jun 6, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading