नवी मुंबईत भुयार खोदून बँकेवर दरोडा, 1 कोटींची रोकड लुटली

नवी मुंबईत भुयार खोदून बँकेवर दरोडा, 1 कोटींची रोकड लुटली

नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर 11 मध्ये बँक ऑफ बडोडमध्ये दरोडा पडलाय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : नवी मुंबईत भुयार खोदून  बँक आॅफ बडोदावर दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यात 1 कोटींची रोकड लंपास करण्यात आलीये.

नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर 11 मध्ये बँक ऑफ बडोडमध्ये दरोडा पडलाय. धक्कादायक म्हणजे जमिनीच्या खालून भुयार खोदून भुयारी मार्गाने चोरट्यांनी हा दरोडा टाकलाय. चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या शेजारील दुकान भाड्याने घेतले होते. तिथेच दरोड्याचा कट शिजला आणि बंद शटरआड भुयार खोदून बँकेवर दरोडा टाकला. चोरट्यांनी  बँकेतील एकूण 237 पैकी 27 लॉकर्स फोडले आणि एक कोटींच्या वर रक्कम लंपास केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published: November 13, 2017, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading