Home /News /mumbai /

मुंबईतील बँक कर्मचाऱ्यांचा धीर सुटला, संघटनेनं घेतली केंद्राकडे धाव

मुंबईतील बँक कर्मचाऱ्यांचा धीर सुटला, संघटनेनं घेतली केंद्राकडे धाव

'गेल्या अडीच महिन्याच्या काळात एकट्या मुंबई महानगरात कोरोनामुळे 12 बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे'

मुंबई, 13 जून : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या परिस्थितीत बँका सुरूच होत्या. पण, आता मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता बँक संघटनेनं थेट केंद्र सरकारकडे उपाययोजना करण्यासाठी धाव घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसच्या वतीने केंद्र सरकारच्या वितीय सेवा विभागाच्या सचिवांना एका पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील कोरोना संसर्ग परिस्थिती लक्षात घेता त्वरित हस्तक्षेप करून राज्य स्तरीय बँकर्स समितीद्वारे सूचना देण्यात याव्यात. यात सर्व बँकांच्या सर्व शाखा रोज सॅनेटाईझ केल्या जाव्यात व प्रत्येक शाखेत गार्ड ठेवण्यात यावा जो बँकेच्या शाखेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.गेल्या अडीच महिन्याच्या काळात एकट्या मुंबई महानगरात कोरोनामुळे 12 बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अंदाजे 120 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती या संघटनेनं दिली आहे. हेही वाचा-7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि... 'मुंबई महानगरात कर्मचारी उपनगरात राहतात तर कामासाठी त्यांना दक्षिण किंवा मध्य मुंबईत यावे लागते. त्यातच लोकल रेल्वेच्या अनुपस्थितीत पुरेशा बेस्ट बस सेवेच्या अनुपस्थितीत कामाच्या ठिकाणी जाणे हे जोखमीचे झाले आहे',अशी व्यथा या संघटनेनं मांडली आहे. त्यातच आता बँकेतर्फे  शंभर टक्के उपस्थितीचा आग्रह धरल्या जात आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांत एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता शक्य आहे तिथे बँक कर्मचाऱ्यांना घरून काम,  एक दिवस आड उपस्थिती, गरोदर महिला व 55 वर्षांवरील कर्मचारी यांना कामातून सूट, 50 टक्के उपस्थिती व सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध 50 लाख रुपयांचा विमा तसंच जाण्या येण्यासाठी वाहन व्यवस्था या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. हेही वाचा-पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाला लागण मुंबईतील कारोनाचा वाढता संसर्ग तसंच मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता बँक कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत असं मत राज्य स्तरीय बँकर्स समितीने पत्रात व्यक्त केलं आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या