मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट, आता 'या' कर्मचाऱ्यांना मिळाली प्रवासाची मुभा

मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट, आता 'या' कर्मचाऱ्यांना मिळाली प्रवासाची मुभा

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई लोकलबाबत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

खासगी, सहकारी क्षेत्रांतील बँक कर्मचाऱ्यांनाना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. सरकारकडून क्यूआर कोड मिळेपर्यंत बँकेचं ओळखपत्र दाखवून कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येईल.

राज्य सरकारच्या विनंतीवरून आणि रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून मिळालेल्या परवानगीनुसार, सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केल्याप्रमाणे एकूण कर्मचार्‍यांच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर विशेष उपनगरी सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या निवडक 10 टक्के बँक कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून, स्टेशन प्रवेशासाठी, लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.

'राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते. प्रवाशांना कोविड-19 साठी अनिवार्यपणे वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते. जनतेला विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 19, 2020, 8:43 PM IST

ताज्या बातम्या