मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING वांद्रे इथं गर्दी जमविल्याप्रकरणी नवी मुंबईतून एक जण ताब्यात

BREAKING वांद्रे इथं गर्दी जमविल्याप्रकरणी नवी मुंबईतून एक जण ताब्यात

Migrant workers shout slogans during a protest against the the extension of the lockdown, at a slum in Mumbai, India, Tuesday, April 14, 2020. Indian Prime Minister Narendra Modi on Tuesday extended the world's largest coronavirus lockdown to head off the epidemic's peak, with officials racing to make up for lost time. (AP Photo/Zoya Thomas Lobo)

Migrant workers shout slogans during a protest against the the extension of the lockdown, at a slum in Mumbai, India, Tuesday, April 14, 2020. Indian Prime Minister Narendra Modi on Tuesday extended the world's largest coronavirus lockdown to head off the epidemic's peak, with officials racing to make up for lost time. (AP Photo/Zoya Thomas Lobo)

नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्याच्यावर संचारबंदीचं उल्लंघन करत नागरिकांना एकत्र केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

नवी मुंबई 14 एप्रिल: वांद्रे स्टेशनजवळ गर्दी जमावल्याप्रकरणी एकाला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विनय दुबे असं त्याचं नाव असून नवी मुंबईतून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. उत्तर भारतीय महापंचयातचा तो अध्यक्ष आहे. ऐरोलीच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. उत्तर भारतीयांसाठी मजदूर आंदोलनाची त्याने हाक दिली होती. परप्रांतीयांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी त्याने आंदोलन छेडलं होतं. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका जाहीर केली होती. 18 तारखेला एकत्र जमण्याचं आवाहनही त्याने केलं होतं. नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. विनय दुबेवर संचारबंदीचं उल्लंघन करत नागरिकांना एकत्र केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काही ट्रेन्स सुरू होणार अशी चुकीची माहिती पसरल्यामुळे वांद्र्यात कामगारांचे उद्रेक झाला अशी माहिती आता पुढे आली आहे. देशभर लॉकडाऊन असताना एवढ्या लोकांचं एकत्रित येणं यामुळे करोना विरुद्धच्या लढ्याची धार कमी होऊ शकते. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. आज वांद्रे स्टेशनच्या जवळ मोठ्या संख्येने तरुण जमले होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अशी आगलावी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करू असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही तासांत काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन: नवरा बायको घरीच असल्याने 'फोन'मुळे बिंग फुटले, अफेअर्स चव्हाट्यावर

महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या