वांद्र्यातली 'ती' आग लागली नाहीतर लावलीच होती !

वांद्र्यातली 'ती' आग लागली नाहीतर लावलीच होती !

मुंबईतल्या वांद्रे भागात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. ही आग लागली नाही तर लावली होती, असं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. शबीर खान असं या आग लावणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला नुकतीच अटकही केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : मुंबईतल्या वांद्रे भागात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. ही आग लागली नाही तर लावली होती, असं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. शबीर खान असं या आग लावणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला नुकतीच अटकही केली आहे.

गरीबनगरमध्ये बीएमसीने सुरू केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई रोखण्यासाठीच त्याने ही आग लावली होती. कारवाई सुरू होताच त्याने आधी त्यानं कचरा पेटवला आणि मग त्यात सिलेंडर टाकलं. त्यामुळे या परिसरात मोठी आग भडकली होती. सुदैवानं यात जीवितहानी झाली नव्हती, पण अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात.

यापूर्वीही या वांद्रे स्थानकानजीकच्या गरीबनगर परिसरात अशाच पद्धतीने आग लावण्याचे प्रकार घडलेत. किंबहुना बीएमसीचे लोक अतिक्रमन हटवण्यासाठी आले की तिथे प्रत्येकवेळी अशाच पद्धतीने आग लावून प्रशासनाला घाबरवलं जातं. म्हणूनच यावेळी तरी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

First published: October 29, 2017, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading