मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईकरांनो..! नवीन वर्षाची पार्टी करताना जरा सांभाळून, BMC आयुक्तांनी जारी केले आदेश; हे आहेत नवे नियम

मुंबईकरांनो..! नवीन वर्षाची पार्टी करताना जरा सांभाळून, BMC आयुक्तांनी जारी केले आदेश; हे आहेत नवे नियम

नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे.

नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे.

नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 25 डिसेंबर: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटनं (new variant of the corona) चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) सावध झालं आहे. नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यानंतर मुंबईतही मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे.

कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC commissioner) यांनी नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा- लग्न समारंभासाठी हॉलमध्ये 100 पेक्षा जास्त जणांना जमण्यास बंदी, महाराष्ट्र सरकारकडून नवे निर्बंध जाहीर

बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार, कोरोनाबाबतच्या या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आयपीसी कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. हा नवा आदेश राज्य सरकारच्या आदेशाव्यतिरिक्त आहे.

राज्य सरकारची नवी नियमावली

1) संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

2) लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

3) इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

4) उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

5) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

6) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

7) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

8) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

9) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

First published:

Tags: BMC, Mumbai