मिनी व्हॅन आणि रिक्षांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यावर बंदी?

मिनी व्हॅन आणि रिक्षांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यावर बंदी?

स्कूल बस म्हणून परवानगी हवी असेल तर गाडीत किमान 13 सीट्स असणं आवश्यक आहे, असे मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेत.

  • Share this:

12 मे : मिनी व्हॅन आणि रिक्षांना शालेय मुलांची वाहतूक करण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. स्कूल बस म्हणून परवानगी हवी असेल तर गाडीत किमान 13 सीट्स असणं आवश्यक आहे, असे मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेत.

स्कूलबाबत एका जनहित याचिकेवर काल (गुरूवारी) हायकोर्टात सुनावणी झाली. मिनी व्हॅन्सना स्कूलबस म्हणून देण्यात आलेली परवानगी रद्द करावी कारण त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाते, असं या याचिकेत म्हटलं होतं.

यावेळी हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने स्कूल बसच्या केलेल्या व्याख्येचा दाखला दिला आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या बसे बंद करा, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 09:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading