S M L

मंत्रालयाच्या दारावर 2 पोती तूर ओतली

बळीराजा शेतकरी संघटनेने आज थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 पोती तूर ओतली.

Sachin Salve | Updated On: May 2, 2017 07:07 PM IST

मंत्रालयाच्या दारावर 2 पोती तूर ओतली

02 मे : शेतकऱ्यांकडील असलेला शेवटचा तुरीचा दाणा संपेपर्यंत तूर खरेदी सुरू ठेवावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने आज थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 पोती तूर ओतली.

सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे हादरलेल्या पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त मागवून आंदोलकांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2017 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close