मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे भगवा...,हिरवा नव्हे...!' 2019मध्ये सेना सोडलेल्या रमेश सोळंकींची Exclusive मुलाखत

'बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे भगवा...,हिरवा नव्हे...!' 2019मध्ये सेना सोडलेल्या रमेश सोळंकींची Exclusive मुलाखत

रमेश सोळंकी (Ramesh Solanki) हे 21 वर्षं शिवसैनिक (Real Shivsainik) होते; पण 2019मध्ये जेव्हा शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) हातात हात मिळवून महाराष्ट्रात (Political Crisis in Maharashtra) सत्ता स्थापन केली

रमेश सोळंकी (Ramesh Solanki) हे 21 वर्षं शिवसैनिक (Real Shivsainik) होते; पण 2019मध्ये जेव्हा शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) हातात हात मिळवून महाराष्ट्रात (Political Crisis in Maharashtra) सत्ता स्थापन केली

रमेश सोळंकी (Ramesh Solanki) हे 21 वर्षं शिवसैनिक (Real Shivsainik) होते; पण 2019मध्ये जेव्हा शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) हातात हात मिळवून महाराष्ट्रात (Political Crisis in Maharashtra) सत्ता स्थापन केली

पुढे वाचा ...
मुंबई, 27 जून : रमेश सोळंकी (Ramesh Solanki) हे 21 वर्षं शिवसैनिक (Real Shivsainik) होते; पण 2019मध्ये जेव्हा शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) हातात हात मिळवून महाराष्ट्रात (Political Crisis in Maharashtra) सत्ता स्थापन केली, त्यानंतर काही तासांतच सोळंकी यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर तीन वर्षांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याच मुद्द्यावरून दुसरा गट स्थापन केला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं आहे. बाळासाहेबांच्या तत्त्वांशी (Ideology of Balasaheb) तडजोड केल्याचं कारण देऊन शिवसेना सोडणारा पहिला शिवसैनिक म्हणजे रमेश सोळंकी. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, न्यूज 18 डॉट कॉमने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यात ते म्हणाले, की 'पक्षात फूट पडणारच होती. कारण ठाकरेंनी बाळासाहेबांची भगव्याची (Bhagwa) तत्त्वं सोडून दिली. शिवसैनिक खूप भावनिक आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भावनेचं राजकारण खेळत आहेत.' सोळंकी यांच्या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत. - शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे पक्ष सोडणारे तुम्ही पहिले शिवसैनिक आहात. शिवसेनेत आत्ता पडलेल्या फुटीकडे तुम्ही कसं पाहता? - होय. या कारणावरून बाहेर पडणारा पहिला शिवसैनिक मी आहे. 26 नोव्हेंबर 2019 रोजी मी राजीनामा दिला. आणि खरं सांगायचं तर, जुन्या शिवसैनिकांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आनंद झाला आहे. हे खूप लवकर होईल, असं मला वाटत होतं. तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाच्या विरोधात काही करत असलात, तर ते दीर्घ काळ टिकत नाही. माझी अशी अपेक्षा होती, की उद्धवसाहेब हे करतील. तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल उद्धवसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बाहेर काढतील, असं वाटलं होतं; पण आता हे घडलं. उशीर झाला तरी ते घडलं हे महत्त्वाचं. - फूट पडल्यानंतरच्या शिवसेनेकडे तुम्ही राजकीयदृष्ट्या कसं पाहता? - मी जे काही केलं आणि आता शिंदे गट जे काही करत आहे ते सारखंच आहे. महाविकास आघाडी सरकार हा पर्याय आदर्श नव्हता. बाळासाहेबांची विचारधारा कायमच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित राहील. 2019मध्ये आपण जी शिवसेना पाहिली, ती शिवसेना नव्हती. ती कशी दिसेल, हे नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल. - मुंबईतले शिवसैनिक म्हणत आहेत, की ठाकरे म्हणजेच शिवसेना. - बाळासाहेबांचे पुत्र असोत किंवा नातू, ते जर बाळासाहेबांच्या विचारधारेविरुद्ध वागले, तर शिवसेना दीर्घ काळ टिकणार नाही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्या विचारधारेशीच तडजोड करणं योग्य ठरणार नाही. - बंडखोर आमदारांना शिवसेनेपासून स्वतःला वेगळं करणं किती कठीण असेल? - माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो, की शिवसेनेपासून वेगळं होणं हा कोणत्याही शिवसैनिकासाठी सर्वांत कठीण निर्णय असतो. मी अगदी जाहीरपणे हे सांगितलं होतं, की माझ्यासाठी तो काळीज चिरून टाकणारा अनुभव होता. बाळासाहेबांकडून कधीही एखादा आदेश आला, की प्रत्येक जण प्राणांचीही पर्वा न करता थेट रस्त्यावर उतरायचा. - शिवसैनिक (Shivsainik) बंडखोर आमदारांच्या (Rebel MLAs) मालमत्तेची नासधूस का करत आहेत? - संघर्ष, निदर्शनं या गोष्टी शिवसेनेच्या रक्तातच आहेत. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही; पण ते रस्त्यावर उतरून निषेध आणि निदर्शनं करू शकले असते. दुर्दैवाने काही घटक मालमत्तेची नासधूस करत आहेत. त्यांनी राज्यातल्या नागरिकांचा विचार करायला हवा. - शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावनिक बनले होते... - शिवसैनिक प्रचंड भावनिक आहेत. त्यामुळे इमोशन कार्ड (Emotion Card) खेळणं म्हणजेच भावनेचं राजकारण केलं जाणारच आहे; पण एका ठरावीक बिंदूनंतर हे कार्ड प्रभावी ठरणार नाही. पक्षात फूट पडणारच आहे. बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला नाकारलं आहे, शिवसेनेला नव्हे. ठाकरेंकडून दर तासाला भूमिका बदलली जात आहे. काही वेळा ते म्हणत आहेत, की आपण पद सोडू आणि नंतर ते बंडखोरांना धमकावत आहेत. - या सगळ्यात आदित्य ठाकरेंकडे तुम्ही कसं पाहता? - कोणीही शिवसैनिक, मग ते उद्धव असोत किंवा आदित्य, ते जर पुढे जाऊ इच्छित असतील, तर त्यांच्याकडे बाळासाहेबांची विचारधारा असणं आवश्यक आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे भगवा. तुम्ही ती हिरवी करू शकत नाही. तुम्ही पुरोगामी होऊ शकता; पण पक्षाचा मूलभूत स्वभाव बदलू शकत नाही. शिवसेनेच्या तरुण नेत्यांना मी सांगू इच्छितो, की बाळासाहेबांशिवाय आपण काहीच नाही. या फुटीचा परिणाम देशपातळीवर होणार आहे. केंद्रीय नेतृत्व अन्य नेत्यांचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात करील. विश्वास ठेवा, बाळासाहेबांची सेना असायला हवी. - तुम्ही एकनाथ शिंदेंना चांगलं ओळखता. तुम्हाला वाटतं, ते आता उद्धव ठाकरेंकडे परत येतील? - ते केव्हाही परत येऊ शकतात. विचारधारेचा विचार केला गेला, तर काहीच अशक्य नाही. शिवसेना जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करू शकत असेल, तर राजकारणात काहीच अशक्य नाही असं मला वाटतं.
First published:

पुढील बातम्या