वाद अखेर मिटणार? थोड्याच वेळात काँग्रेस नेते 'मातोश्री' वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

वाद अखेर मिटणार? थोड्याच वेळात काँग्रेस नेते 'मातोश्री' वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

राज्यपाल नियुक्तं विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या संख्येवरून खरंतर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जून : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते नाराज असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांची भेट होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भेटणार आहेत. 'मातोश्री'वर दुपारी दीड वाजता होणाऱ्या या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला दूय्यम वागणुक मिळत असल्याची तक्रार यावेळी काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रिया असेल किंवा अधिकारांचं वाटप असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा सरकारमध्ये जाणवत आहे. त्यामुळे दुखावलेले काँग्रेस नेते आज मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडणार आहेत.

पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यपाल नियुक्तं विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या संख्येवरून खरंतर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी जी निवडणूक झाली ती बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने आपला एकच उमेदवार देत एक पाऊल मागे घेतलं होतं.

आता राज्यपाल नियुक्तं विधान परिषदेच्या 12 जागांसाठी महविकास आघाडीचं शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि काँग्रेस 3 असं संख्याबळानुसार नियोजन आहे. मात्र, यावेळी काँग्रेसला एक अधिकची जागा हवी आहे. याच मागणीसाठी ही बैठक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाराज काँग्रेसची ही मागणी पूर्ण झाली तर विधान परिषदेच्या 12 पैकी शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि काँग्रेस 4 असं समसमान वाटप होईल.'

महाविकास आघाडीचा संख्याबळानुसार नियोजित प्लान

1) शिवसेना 5

2) राष्ट्रवादी-काँग्रेस 4

3) काँग्रेस 3

काँग्रेसची मागणी

1) शिवसेना 4

2) राष्ट्रावादी काँग्रेस 4

3) काँग्रेस 4

 

First published: June 18, 2020, 12:10 PM IST

ताज्या बातम्या