लवकरच होणार खातेवाटप काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने दिले संकेत

लवकरच होणार खातेवाटप काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने दिले संकेत

सरकार स्थापन झालंय. आमच्यात कोणताही वाद नसून उद्यापर्यंत खातेवाटप होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले

  • Share this:

हरिश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी,7 नोव्हेंबर: सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचे लवकरच खातेवाटप होणार असून याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या खातेवाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. तीनही पक्ष एका विचाराने एकत्र आले असून आमच्यात कोणताही वाद नसल्याचेही बाळासाहेब थोरात स्पष्ट केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मंत्री झाल्यानंतर शिर्डीत साईदर्शन घेतले. सरकार स्थापन झालंय. आमच्यात कोणताही वाद नसून उद्यापर्यंत खातेवाटप होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. शेतकरी कठीण परीस्थितीतून जातोय ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगत संपूर्ण कर्जमाफी कधी करणार या प्रश्नाला मात्र थोरातांनी बगल दिली. आपण पक्ष सोडून गेलो ही चुकच झाली, असे अनेकांना वाटतंय. मात्र ते पुन्हा येणार असतील तर नव्याने त्यांच्या जागी तयार झालेल्या तरूणांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. ज्यांनी पक्ष सोडून जाणारांची जागा धरलीय त्यांना ताकद देण्याची आमची भुमिका असून कोणी परत यावे यासाठी कोणाची मनधरणी करणार नसल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले. हे सरकार आम्हाला पाच वर्षे चालवायचंय आहे. त्यासाठी तीन घटक पक्ष एकत्र येताना सुरवातीलाच ही काळजी घेण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

..तर 'वेट अ‍ॅण्ड वॉच'

विधानसभा निवडणुकीच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मात्र विखे पाटील यांच्यासह कोणी स्वगृही परतण्यास उत्सुक असेल तर 'वेट अ‍ॅण्ड वॉच', असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. राधाकृष्ण विखेंबाबत थेट त्यांना विचारा की ते अस्वस्थ आहेत का, असा प्रतिसवालही थोरतांनी केला आहे. तसेच जिल्ह्याच्या आणि राज्याच्या काँग्रेसच्या किल्या आपल्याकडे असल्याचेही सूचित केले. पक्ष सोडून गेलेल्यांचा निर्णय नवनेतृत्त्वाकडे गेला असल्याचेही थोरातांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात हे अहमदनगरात बोलत होते. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीचा शुक्रवारी एन्काउंटर करण्यात आला. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बलात्कारासारखे खटले फास्ट ट्रॅकवर चालवून त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे. नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायद्यात त्रुटी असतील तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यायला हवेत, असे मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलेय गरज असल्यास कायद्यात बदल करा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 7, 2019, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading