मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की...' थोरातांच्या कन्येनं पडळकरांना शिकवले संस्कार

'पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की...' थोरातांच्या कन्येनं पडळकरांना शिकवले संस्कार


'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती.'

'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती.'

'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती.'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 जून : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आपल्या टीकेमुळे कायम चर्चेत असतात. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasheb thorat) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या टीका केली म्हणून पडळकरांनी खालच्या भाषेत ट्वीट करून विखारी टीका केली होती. पण 'पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं, आपल्या भाषेवरून आपल्या संस्काराची ओळख होते' अशा शब्दांत थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी चांगले सुनावले आहे.

आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळवून देतो जर असं झालं नाहीतर राजकीय संन्यास घेईल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांनी वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही, केलेल्या विधानाची आठवण करून दिली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले होते.

नेहमीप्रमाणे या वादात उडी घेत गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका केली होती.

पडळकरांच्या या टीकेल्या थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट करून जशास तसे उत्तर दिले.

'पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!' असं म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकरांना चांगलेच संस्काराचे धडे दिले.

महाराष्ट्रात का वाढताहेत कोरोना रुग्ण?; डेल्टा + व्हेरिएंटचा कसा होतोय परिणाम?

शरयू देशमुख या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहे. संगमनेरमधील अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या त्या संचालिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरयू देशमुख या सक्रीय राजकारणात सहभागी होतील अशी चर्चा आहे. पण, अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.

First published: