मुख्यमंत्र्यांमध्ये मला विरोधी पक्षनेता दिसतो, थोरातांचा पलटवार

मुख्यमंत्र्यांमध्ये मला विरोधी पक्षनेता दिसतो, थोरातांचा पलटवार

'नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या वाद नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतही बदल झाला. पण चर्चा मात्र आमचीच होते.'

  • Share this:

मुंबई 28 ऑगस्ट : भाजप-शिवसेना युतीची सत्ता आणखी 25 वर्ष राहणार आहे. काँग्रेस काय पोल खोल करणार, जनतेनेच त्यांना जागा दाखवली अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये मला विरोधीपक्षनेता दिसतोय अशी टीका त्यांनी केलीय. भाजला सत्तेची गुर्मी आलीय अशी टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजनशी आघाडी व्हावी असं आम्हाला वाटते असं सांगत त्यांनी चर्चेची दार अजुनही उघडी असल्याचं सांगितलं.

थोरात म्हणाले, जे  नेते पक्षसोडून जात आहेत तिथे आमचे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते तयार आहेत. नव्या दमाच्या लोकांना आम्ही संधी देणार आहोत. काही लोक सोडून गेल्यामुळेच नव्या लोकांना संधी मिळाली असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

नागपूरात पावसाचा पत्ता नाही, मात्र धरण भरलं 32 टक्के; हे आहे 'सिक्रेट'

नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या वादावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, असा काही वाद नाही. यात्रेत काही बदल होत असतात. मुख्यमंत्र्यांच्याही यात्रेत ही बदल होतात, मग फक्त काँग्रेसची चर्चा का अधिक होते असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याने ब्रम्हपुरी येथे बुधवारी होणारी 'महापर्दाफाश' सभा अखेर रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या नेतृत्त्वाच्या संघर्षात विजय वडेट्टीवार यांचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

गुंडांच्या टोळ्यांना पोलिसांचा हादरा, तब्बल 200 जणांना करणार तडीपार

विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. 'महापर्दाफाश' सभा रद्द होण्यामागे विजय वडेट्टीवार यांची खेळी असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक असल्याचे कारण विजय वडेट्टीवार यांनी पुढे केले आहे.

काँग्रेसच्या अडचणी वाढणार, विजय वडेट्टीवार नाराज!

दरम्यान, विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असे असताना काँग्रेस पक्षातला गोंधळ संपण्याची काही चिन्हे नाही. राज्यातले विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हेच पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. महत्त्वाच्या समितीतच डावलण्याने ते नाराज आहेत. हे पक्षातले राजकारण असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या काँग्रेसमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नाही, असेच म्हटले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहीर केली आहे. पण या समितीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना स्थान नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या समितीतच आपले नाव नसल्याने वड्डेटीवार नाराज आहेत.

First published: August 28, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading