S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज पाचवा स्मृतीदिन, स्मृतिस्थळावर शिवसैनिकांची गर्दी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Nov 17, 2017 12:05 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज पाचवा स्मृतीदिन, स्मृतिस्थळावर शिवसैनिकांची गर्दी

17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केलीय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बाळासाहेबांना अभिवादन केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृती स्थळावर   शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

त्याच बरोबर आज दिवसभरात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी इतर पक्षांतील नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर देखील येणार आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्कवर लक्ष्मी कांबळे या वाळू शिल्प कलाकाराने बाळासाहेबांचं  वाळू शिल्प साकारून अभिवादन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close