S M L

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देऊ नका, हायकोर्टात याचिका

बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबई महापौरांचा बंगला देण्यास आणि त्याकरिता सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 08:33 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देऊ नका, हायकोर्टात याचिका

विवेक कुलकर्णी, मुंबई

29 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न आता उच्च न्यायालयात आला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबई महापौरांचा बंगला देण्यास आणि त्याकरिता सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

भगवानजी रयानी यांनी ही याचिका केली आहे. उन्हाळी सुटीनंतर ५ जूनपासून उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

बाळासाहेबांनी आयुष्यात कधीही कोणतेही वैधानिक पद भूषवलेले नसून त्यांना हुतात्माही म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ एका पक्षाचे नेते म्हणून त्यांच्याकरिता सरकारी निवासस्थानाची जागा देणे उचित नाही. शिवाय कोणतेही सरकारी निवासस्थान हे स्मारकासाठी देऊ नये, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकमधील एका प्रकरणाच्या निवाड्यात स्पष्ट म्हटलेले आहे,’ असे मुद्दे रयानी यांनी आपल्या याचिकेत मांडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close