Home /News /mumbai /

बाळासाहेबांच्या आशीर्वादांमुळे आमचा मुख्यमंत्री, सेना नेत्याचा फडणवीसांना सणसणीत टोला

बाळासाहेबांच्या आशीर्वादांमुळे आमचा मुख्यमंत्री, सेना नेत्याचा फडणवीसांना सणसणीत टोला

'बाळासाहेबांनी (balasaheb thackeray) सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना (Shivsena) चालत आलेली आहे. बाळासाहेब आमच्यातून गेले असले तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत'

    मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या (Balasaheb Thackeray Memorial Day) स्मृतीदिनावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (shivsena) शाब्दिक युद्ध पेटले आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा व्हिडीओ ट्वीट करून सेनेला डिवचले. त्यानंतर आता सेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी 'बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सेनाचा मुख्यमंत्री झाला आहे', असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. अनिल परब यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर न्यूज18 लोकमतशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला उत्तर दिले. पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये भाजपला हादरा,माजी मंत्र्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा 'बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालत आलेली आहे.  बाळासाहेब आमच्यातून गेले असले तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत. बाळासाहेबांनी आशिर्वाद दिल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे' असं म्हणत परब यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. 'बाळासाहेब हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालत आहोत. आजच्या दिवशी टीका टिप्पणी करणे योग्य नाही. यथावकाश योग्य उत्तर दिलं जातील', असं म्हणत परब यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळले. CBSCच्या 10वी-12वीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार नाही-सुप्रीम कोर्ट तर शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीही फडणवीसांच्या ट्वीटचा समाचार घेतला. 'जर त्यांच्या विचारांवर आणि विधांनावर ठाम असते तर महाराष्ट्रात आता वेगळी स्थिती दिसली असती', असा सणसणीत टोला सरनाईक यांनी फडणवीसांना लगावला. इथं शिवसेनेनं घेतलेल्या भुमिकेमुळं बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री झालेत, त्यामुळं त्यांचे अभिनंदन आहे, असंही सरनाईक म्हणाले. हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही -संजय राऊत दरम्यान, आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आजही आहे आणि कायम राहणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला. काय म्हणाले होते फडणवीस? भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही वाक्य आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्त्रोत होते. बाळासाहेबांचं भाषण हे नेहमी सल्ला होते.  आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचं, लोकांना पटेल असं बोलायचं. त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलायचे. त्यांना कोणी बोलावू शकत नव्हतं' असं फडणवीस यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. 'दुसऱ्यांच्या विचाराने स्वत: चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की संपलं. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले  पाहिजे' असं बाळासाहेबांचं विधान सांगत फडणवीसांनी सेनेला टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या