Home /News /mumbai /

'विधानांवर ठाम', बाळासाहेबांच्या भाषणाच्या व्हिडीओतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

'विधानांवर ठाम', बाळासाहेबांच्या भाषणाच्या व्हिडीओतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

तसंच अमित शहा आणि पक्षाचे इतर नेते यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसा आदर होता हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Memorial Day) आहे. त्यानिमित्ताने भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.  फडणवीस यांनी या व्हिडीओतून सेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणच करून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही वाक्य आहे. 'बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्त्रोत होते. बाळासाहेबांचं भाषण हे नेहमी सल्ला होते.  आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचं, लोकांना पटेल असं बोलायचं. त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलायचे. त्यांना कोणी बोलावू शकत नव्हतं' असं फडणवीस यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. 'दुसऱ्यांच्या विचाराने स्वत: चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की संपलं. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले  पाहिजे' असं बाळासाहेबांचं विधान सांगत फडणवीसांनी सेनेला टोला लगावला आहे. तसंच अमित शहा आणि पक्षाचे इतर नेते यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसा आदर होता हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे विचारांवर आणि विधानांवर ठाम होते, असं म्हणत शिवसेनेला त्यांच्या बदललेल्या भूमिकेची आठवण करुन देण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या