मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच उद्धव आणि राज ठाकरेंचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच उद्धव आणि राज ठाकरेंचं मुंबईत शक्तिप्रदर्शन


मुंबईत शिवसेनेचा जल्लोष मेळावा तर मनसेचं अधिवेशन एकाच दिवशी होणार असल्याने हे दोन ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईत शिवसेनेचा जल्लोष मेळावा तर मनसेचं अधिवेशन एकाच दिवशी होणार असल्याने हे दोन ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईत शिवसेनेचा जल्लोष मेळावा तर मनसेचं अधिवेशन एकाच दिवशी होणार असल्याने हे दोन ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 10 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच शिवसेना मुंबईत जल्लोष मेळावा घेणार आहे. 23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. पहिल्यांदाच ठाकरे घराण्याची व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. तर याच दिवशी मनसेनेही मुंबईतच महामेळावा घेण्याची घोषणा केलीय. त्यात राज ठाकरे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून हे दोन ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुंबईत शिवसेनेकडून होणारा जंगी सत्कार भव्य दिव्य करण्यासाठी शिसेनेचे सरदार कामाला लागले आहेत. बीकेसीतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात हा सत्कार होणार आहे. या सत्कार सभेला 50,000 हजारांहून अधीक शिवसैनिक उपस्थित रहाण्याचं नियोजन शिवसेनेने केलंय. यात देशातील नामवंत राजकीय नेते, उद्योजक आणि कलाकार उपस्थित राहणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी दिलीय. जल्लोष मेळावा असं नाव या सभेला शिवसेनेने दिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत पराभवाचे धक्के खात असलेली मनसे आता कात टाकणार आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. मनसेचा असलेला पंचरंगी झेंडा आता बदलणार आहे. आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्या अग्रभागी होता.

आईने तान्हुलीला रस्त्यावर टाकलं, मात्र वर्दीतल्या मातेनं ह्रदयाशी कवटाळलं

आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत.

JNU वाद: स्मृती इराणींनी दीपिकावर केला हा गंभीर आरोप

मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
First published:

Tags: Raj Thackeray, Uddhav thackeray

पुढील बातम्या