30 डिसेंबर : कमला मिलमध्ये पब आणि रेस्टाॅरंट आहे. त्या तिरुपती बिल्डरशी 'बाळराजेंची' आर्थिक भागीदारी आहेत. हे बाळेराजे कोण याचा शोध घेतला पाहिजे असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिल कम्पाऊंडमध्ये मोजोस रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला. आज आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कमला मिलमध्ये दुर्घटनास्थळी भेट दिली.
ज्यांचे कमला मिलमध्ये पब आणि रेस्टारॅरंट आहे. त्या तिरुपती बिल्डरशी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या 'बाळराजेंची' आर्थिक भागीदारी आहेत. त्यांच्यासोबत एका माजी क्रिकेटपटूचीही आर्थिक भागीदारी आहे. हे बाळेराजे कोण याचा शोध घेतला पाहिजे असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केलाय. तसंच या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. पण ही चौकशी निव्वळ फार्स आहे. याआधी सुनील शितपवर चौकशीचे आदेश दिले नंतर क्लिन चिट दिली अशी टीकाही विखे पाटलांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा