Air Strike : मुंबईसह राज्यात हाय अलर्ट, शाळांच्या बसवर दहशतवादी हल्ल्याची भीती

सीमेवर गोळीबार, Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 01:04 PM IST

Air Strike : मुंबईसह राज्यात हाय अलर्ट, शाळांच्या बसवर दहशतवादी हल्ल्याची भीती

मुंबई, 27 फेब्रुवारी : पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रातील राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेस तसेच शहरांमधील बसला दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे. तसेच कमांडो पथकही सज्ज केलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये तीन किलो आयईडी हस्तगत करण्यात आले होते. जर घातपात झाला असता तर संपूर्ण बस उडाली असती. गुप्तचर संस्थांनी रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना दिस्या आहेत.

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाककडून काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच पाकची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. यातील एफ 16 विमान भारताने पाडले. यामुळे जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथील विमानतळांवरील प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सीमेवर गोळीबार

Loading...

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.


भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...