बाळासाहेब मुस्लिमांचे नाही देशद्रोह्यांचे दुश्मन! -उद्धव ठाकरे

बाळासाहेब मुस्लिमांचे नाही देशद्रोह्यांचे दुश्मन! -उद्धव ठाकरे

बाळासाहेब हे मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते, ते देशद्रोह्यांचे दुष्मन होते, त्यामुळं पाकिस्तान आपला दुष्मन आहे, मुसलमान नाही असं मत उद्धव ठकरे यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात केलं.

  • Share this:

 17 डिसेंबर: शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधक नव्हते तर देशद्रोही लोकांचे विरोधक होते असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ऑल इंडिया इन्सानियत परिषदेत  ते बोलत होते.

बाळासाहेब हे मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते, ते देशद्रोह्यांचे दुष्मन होते, त्यामुळं पाकिस्तान आपला दुष्मन आहे, मुसलमान नाही  असं मत उद्धव ठकरे यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात केलं. सामाजिक एकतेसाठी ऑल इंडिया इन्सानियत अभियानात तर्फे आज मुंबईत एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्व धर्मांमध्ये एकोपा नांदावा यासाठी गेली सहा वर्ष या संस्थेतर्फे अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतंय.

बाळसाहेब ठाकरेंना  हिंदुह्र्दयसम्राट संबोधलं जातं होतं. ते मुस्लिम विरोधक असल्याचा आरोपही  त्यांच्यावर केला जायचा. पण या सगळ्या आरोपांचे आज ठाकरेंनी खंडण केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 10:11 PM IST

ताज्या बातम्या