बकरी ईद... मुंबई हायकोर्टचा मोठा निर्णय, तब्बल 7 हजार परवाने रद्द होणार

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टने मंगळवारी (6 ऑगस्ट) मोठा निर्णय दिली आहे. बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास हायकोर्टने मनाई केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:47 PM IST

बकरी ईद... मुंबई हायकोर्टचा मोठा निर्णय, तब्बल 7 हजार परवाने रद्द होणार

मुंबई, 6 ऑगस्ट- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टने मंगळवारी (6 ऑगस्ट) मोठा निर्णय दिली आहे. बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास हायकोर्टने मनाई केली आहे. मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे सात हजार अर्ज फेटाळून बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी कत्तलखान्यातच करावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसेच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास कोर्टाने मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे सात हजार अर्ज रद्द होणार आहे. कत्तलखान्यात कुर्बानीची व्यवस्ठा असलेल्या कोणत्याही फ्लॅट आणि गृहनिर्माण सोसायटीत स्वतंत्र परवानगी देऊ नका, असे निर्देश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत.

दिली होती ऑनलाइन जाहिरात..

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने ऑनलाइन जाहिरात दिली होती. तात्पुपत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचे या जाहिरातीतून सूचित करण्यात आले होते. त्यावर काही प्राणीमित्र संघटनांनी हरकत घेत हायकोर्टात धाव घेतली होती. प्राणी संरक्षण कायद्यासह महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्राणीमित्रांनी याचिकेत म्हटले होते. फ्लॅट आणि सोसायटी परिसरात दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला या याचिकेद्वारे विरोध करण्यात आला होता.

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bakri eid
First Published: Aug 6, 2019 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...