तुमच्या आवडत्या 'बजाज चेतक'चा आलाय नवा अवतार, एकदा बघाच!

चेतकची पूर्णपणे मेटलची बॉडी असून जानेवारी 2020 पासून ही गाडी विक्रिस बाजारात उपलब्ध होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 02:51 PM IST

तुमच्या आवडत्या 'बजाज चेतक'चा आलाय नवा अवतार, एकदा बघाच!

मुंबई 16 ऑक्टोंबर : स्कुटर म्हटलं की सगळ्यात पहिले नाव डोळ्यासमोर येतं ते बजाजचं. बजाजच्या 'प्रिया' आणि 'चेतक' या दोन ब्रॅण्ड्सनी देशभर आपली नाममुद्रा लोकांच्या मनावर ठसवली होती. पण कालांतराने बाजारातून स्कुटर हद्दपार झाली आणि मोटरसायकलची चलती आली. त्यानंतर बजाजने स्कुटरचं उत्पादन पूर्णपणे बंद केलं आणि मोटरसायकलवर लक्ष केंद्रीत केलं. पण नव्या काळाची गरज ओळखून बजाजने चेतकचा नवा आवतार बाजारात आणलाय. नवी चेतक ही Electric बाईक आहे. नव्या पिढीच्या लोकांना ती नक्की आवडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय.

तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना?

बजाजच्या चाकण इथल्या प्रकल्पात 25 सप्टेबरपासून या गाड्यांचं उत्पादन सुरू झालंय. प्रदुषणापासून मुक्त आणि दणकट असलेली ही गाडी लोकांना नक्कीच आवडेल असा विश्वास केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल असंही ते म्हणाले.ECO आणि SPORTS अशा दोन श्रेणीमध्ये या गाड्यांची मॉडेल्स उपलब्ध आहेत. ECOचा 95 तर SPORTS चा 85 kmची रेंज आहे. चेतकची पूर्णपणे मेटलची बॉडी असून जानेवारी 2020 पासून ही गाडी विक्रिस बाजारात उपलब्ध होणार आहे.

असिस्टंट कमिशनरकडे सापडली 150 कोटींची काळी कमाई!

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आता इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांना मोठी मागणी आहे. आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती, मेंटेनसचा खर्च आणि प्रदुषणामुळे नागरिकही आता इलेक्ट्रीक गाड्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे बजाजने हे नव्या अवतारात ही गाडी बाजारात आणली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bajaj
First Published: Oct 16, 2019 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...