मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

क्रुझ ड्रग्स प्रकरणी 2 जणांना जामीन, आर्यनच्या सुनावणीवर होणार मोठा इम्पॅक्ट?

क्रुझ ड्रग्स प्रकरणी 2 जणांना जामीन, आर्यनच्या सुनावणीवर होणार मोठा इम्पॅक्ट?

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता.

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता.

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून 2.4 ग्रॅम गांजा जप्त केला होता.

मुंबई, 26 ऑक्टोबर : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (cruise drugs case) प्रकरणी आर्यन खानच्या (Aryan Khan arrest case) जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात (mumbai high court) सुनावणी पार पडली. आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणात दोन जणांना जामीन मिळाला आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. मुबंई सत्र न्यायालयाने या दोघांना जामीन दिला आहे.

अविन शाहू आणि मनिष राजगरीया या दोघांना जामीन मिळाला आहे.

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता. या दोघांना व्यक्तीगत ५० हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. अविन शाहू हा ज्वेलर्स आहेत. ४ ॲाक्टोबरला अविन शाहूला अटक केली होती. क्रूझवर पार्टी आणि तोडफोड प्रकरणी NCB ने एकूण ४ जणांना अटक केली होती.

मराठी कलाविश्वातील 'हे' क्यूट कपल लवकरच होणार आई-बाबा, पाहा Photo

दरम्यान, मुबंई सत्र न्यायालयाने मनिष राजगरीया याला जामीन दिला. मनिषकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता. आज ५० हजार रुपयांचा जामीन देण्यात आला, या निर्णयामुळे उद्याच्या आर्यन खान प्रकरणाच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, असे मत ॲड तारक सय्यद यांनी केला आहे.

आर्यनच्या जामिनीवार उद्या सुनावणी

आर्यन खान प्रकरणी मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी  भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. कोर्टात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सुनावणीसाठी अडथळा आला होता. न्यायमूर्तीला सुनावणी थांबवावी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी कोर्टातली गर्दी कमी केली. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. वरीष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला.

नोव्हेंबर महिन्यात 17 दिवस बंद राहणार बँका, लवकर पूर्ण करा तुमची कामं

'आर्यन सध्या 23 वर्षाचा आहे. तो कैलिफोर्नियात शिकतो. तो क्रुझवरून गोव्याला जात होता. त्यानं तिकीट काढलेलं नव्हतं, त्याला आमंत्रण दिलं गेलं होतं. क्रुझवर एका कार्यक्रमासाठी तो पाहुणा म्हणून आला होता. त्याचा मित्र अरबाझ मर्चंटसोबत जात होता. एनसीबीकडे आधीपासूनच माहिती होती की या क्रुझवर अमली पदार्थ नेले जाणार आहेत. अरबाझच्या बुटात काही प्रमाणात अमली पदार्थ सापडले. मात्र आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे आर्यनला पकडण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र पोलिसांची आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करत आर्यनला अटक केली. आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही. त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही, असं म्हणत तोफान सिंग प्रकरणाचा रोहतगी यांनी कोर्टात उल्लेख केला.

आता पाण्याच्या इंधनावर चालणार गाड्या;पेट्रोल-डिझेल वाढत्या किमतीत मोठा दिलासा

तसंच, आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही. केवळ मित्राच्या बुटात काही सापडलं म्हणून आर्यनला कसं जबाबदार धरता येईल? असा सवाल रोहतगींनी उपस्थितीत केला.

First published: