काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश

कुठलेही टार्गेट नाही, आमच्या कडे कोणते ही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेचं काम पाहून लोक आकर्षित होत आहेत. चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 09:59 PM IST

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई 25 ऑगस्ट : राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आता फक्त दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेतलं इन्कमिंग सुरूच असून आज बहूजन विकास आघाडीचे बोईसर विधान सभा मतदारसंघांचे आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  कुठलेही टार्गेट नाही , आमच्या कडे कोणते ही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेचं काम पाहता आकर्षित पक्ष प्रवेश होत आहेत. चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे.

शिवसेनत प्रवेश घेतल्यानंतर तरे म्हणाले, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा सेनेत प्रवेश केला आहे. कोणावर मी नाराज नाही आणि मला कोणाची मला भीती ही नाही.

वाचा -अमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या तयारीत भाजप शिवसेनेने यात आघाडी घेतलीय. अर्ध्या अर्ध्या जागा मिळून लढविण्याचं दोन्ही पक्षांनी ठरवलंय. मात्र त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं नव्हतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत आज स्पष्टिकरण दिलंय. भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप हे भाजपाध्यक्ष अमित शह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठरविणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा होत होती त्यामुळे त्या चर्चेंना आता पूर्ण विराम मिळणार आहे.

युतीतल्या मित्रपक्षांना जागा सोडून राहिलेल्या जागा अर्ध्या अर्ध्या लढविण्याचं भाजप आणि शिवसेनेत ठरलं आहे. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. मात्र फारसी काही अडचण येणार नाही असा अंदाच व्यक्त केला जातोय. त्यामुळे लवकरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Loading...

वाचा- धक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेचा वाट धरली आहे. मतदारसंघ शिवसेनेकडे आहे की भाजपकडे याचा विचार करून नेते त्या त्या पक्षात येत आहेत. राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार लवकरच हातावरचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची शक्यता असून राष्ट्रवादीला पुन्हा मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बडे नेते धास्तावले असून गळती रोखायची कशी असा प्रश्न मोठ्या नेत्यांना पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...