'असा मोहरा ना कधी झाला ना कधी होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार'

'असा मोहरा ना कधी झाला ना कधी होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार'

चिंताग्रस्त झालेल्या तरुणाच्या पालकांनी मदतीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं.

  • Share this:

मुंबई, 3 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनच्या काळात वाढ करण्यात आली. मात्र या लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात कामानिमित्त गेलेले विद्यार्थी आणि कामगार अडकून पडले. नोकरीसाठी तामिळनाडूतील चेन्नई इथं गेलेला बदलापूर येथील एक तरूण अडकला. त्यानंतर चिंताग्रस्त झालेल्या तरुणाच्या पालकांनी मदतीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं.

चेन्नईत अडकलेल्या तरुणाच्या वडिलांनी मदतीसाठी मेलद्वारे पाठवलेल्या पत्राला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला. तसंच शासकीय पातळीवर हालचाली करत संबंधित तरूणाची राहण्याची आणि इतर व्यवस्था करण्यात आली. मुलासाठी मागितलेल्या मदतीला उद्धव ठाकरे यांनी त्वरित प्रतिसाद दिल्याने तरुणाचे वडील भारावून गेले आणि मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र पाठवलं

'महाराष्ट्र राज्याला आपल्यासारखा कर्तबगार मुख्यमंत्री मिळाल्याने आम्ही सर्व नागरिक आनंदीत आहोत. मी पाठवलेल्या अर्जाचा तुम्ही दयाळूपणे विचार केला आणि कार्यवाही केली. त्यामुळे त्याला चेन्नईतील हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी मिळाली. आपले कोटी कोटी आभार. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते...असा मोहरा ना कधी झाला न होणार...उद्धवजी हे नाव जगात गर्ज राहणार,' अशा शब्दांत तरुणाच्या वडिलांनी उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे हे पत्र आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

(व्हायरल झालेलं पत्र)

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 3, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या