'केईएम'च्या निष्काळजीवणामुळे हात कापावा लागलेल्या 2 महिन्यांच्या प्रिन्सचा अखेर मृत्यू

'केईएम'च्या निष्काळजीवणामुळे हात कापावा लागलेल्या 2 महिन्यांच्या प्रिन्सचा अखेर मृत्यू

प्रिन्सचा हात, कान, डोके आणि छातीचा भाग भाजला होता. त्याच्या हातावरील जखम मोठी होती.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीवणामुळे लागलेल्या आगीत हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर याचा अखेर मृत्यू झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती. गुरूवारी मध्यरात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

ईसीजी मशीनच्या आगीत होरपळला होता प्रिन्स...

उत्तर प्रदेशहून आलेल्या प्रिन्स राजभर याला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गेल्या 7 नोव्हेंबरला ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला होता. त्यात प्रिन्सचा हात, कान, डोके आणि छातीचा भाग भाजला होता. त्याच्या हातावरील जखम मोठी होती. गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली होती. मात्र, तरी प्रिन्सला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नसल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप दोषी कोण हे जरी सिद्ध झाले नसले तरी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

10 लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय..

केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीवणामुळे लागलेल्या आगीत हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते. उपचारानंतर आयुष्याची वाटचाल सुंदर व्हावी म्हणूज उत्तरप्रदेशवरुन आलेल्या प्रिन्सच्या नशिबात वेगळाच खेळ मांडला होता. पण यात रुग्णालयाकडून दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Tags:
First Published: Nov 22, 2019 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading