मोर्चात खरे शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त, प्रवीण दरेकरांचा दावा

मोर्चात खरे शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त, प्रवीण दरेकरांचा दावा

'महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहे. ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको',

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : कृषी कायद्याविरोधात मुंबईत  शेतकऱ्यांचा विराट मोर्चा  (azad maidan farmers protest) धडकला आहे. परंतु, आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, या मोर्चात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकपासून हजारो शेतकरी मुंबईत धडकले आहे. आझाद मैदानावर शेतकऱ्यांची विराट अशी सभा पार पडली. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर टीका केली आहे.

'आजच्या मोर्चात खरे शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त आहे. मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, असा दावाच दरेकर यांनी केला आहे.

'भेंडी बाजारातल्या महिला शेतकरी कशा ? काल या महिला आझाद मैदानावर होत्या', असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

'महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहे.  ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको', असं म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.

शरद पवारांची भूमिका सातत्याने बदलत असते हे सगळ्यांनी पाहिलं आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मोर्चाला न गेल्याने त्यांची भूमिका बदललेली दिसत आहे. शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

शरद पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका

दरम्यान, 'देशात वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी दिल्लीत प्रचंड अभूतपूर्व शांततामय आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्यांनदल मी तुमचे अभिनंदन करतो. ज्यांच्या हातात सत्ता आहे, पण त्यांना शेतकरी कष्टकरी किंमत नाही. शेतकरी रस्तावर बसला आहे पण पंतप्रधान मोदी यांनी साधी चौकशी केली का? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का? साधा शेतकरी आहे तो, त्याची विचारपुस सुद्धा करावीशी वाटली नाही का? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी विचारला.

ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. कायदे करताना चर्चा होऊन एकमताने मंजूर केले जातात, चर्चा नाही समिती नाही, अशी भूमिका कायदा करताना केंद्र सरकारची राहिली, चर्चा न करता कायदा मंजूर केला, त्यामुळे जनता सत्ता उलथवून राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीकाही शरद पवार यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 4:25 PM IST

ताज्या बातम्या