• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मृतदेह घरात पडून राहिला पण डॉक्टरांनी नाही दिलं मृत्यू प्रमाणपत्र, कारण...

मृतदेह घरात पडून राहिला पण डॉक्टरांनी नाही दिलं मृत्यू प्रमाणपत्र, कारण...

गेल्या काही महिन्यांपासून मृतदेह प्रमाणपत्र देण्यास ठाणे पालिकेतील डॉक्टर टाळाटाळ करताहेत. त्यामुळं मृत्यूप्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाईकांना हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळं नगरसेवकाच्या इशाऱ्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.

  • Share this:
 ठाणे, 18 जानेवारी:  ठाण्यातील मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्युचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळं मृतदेहाला घरात ठेवून नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांनी केलाय. त्यामुळं मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना तातडीनं मृत्यू प्रमाणपत्र द्यावं. अन्यथा मृतदेह घेऊन ठाणे पालिका मुख्यालयाच्या दारात उभे राहू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ पठाण यांनी दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकीतच त्यांनी हा इशारा दिल्यानं प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत इशारा   ठाणे महानगर पालिकेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पार पडली.  या बैठकीमध्ये अश्रफ पठाण यांनी मुंब्रा भागात मयत झालेल्यांना मृत्युचे प्रमाणपत्र देण्यास स्थानिक डॉक्टरांना टाळाटाळ केली. मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थानिक डॉक्टर सतत टाळाटाळ करत असल्याचा आरोप बैठकीत पठाण यांनी केला. त्यामुळं अशा डॉक्टरांवर कारवाई करून मृतकाच्या नातेवाईकांना मृत्यूप्रमाणपत्र तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली आहे. हेही वाचा - मोबाईल चोराने घेतला चावा, ब्लेड ने वार करून लांबविला मोबाईल आणि पैसे मृत्यूप्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ का? मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करुन डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरू केलंय. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो अशा लोकांनाही मृत्युचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत असते. काही वेळा तर हजारो रुपये मोजून मृत्यू प्रमाणपत्र मिळवावे लागत आहे. या सर्व प्रकाराला ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य खाते जबाबदार असल्याची तक्रार मुंब्रावासिय करीत आहेत. त्यामुळे जर ही समस्या निकाली काढली नाही तर अंत्ययात्रा थेट ठाणे महापालिकेच्या प्रवेश द्वारात घेऊन येणार असल्याचा इशारा नगरसेवक पठाण यांनी दिलाय. त्यानंतर जे काही होईल त्याला ठाणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग नगरसेवक पठाण यांच्या या इशार्‍यानंतर स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी ही समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी, येत्या आठवड्यामध्ये पालिकचे आरोग्य अधिकारी डॉ. वाळवीकर आणि मुंब्रा-कौसा येथील डॉक्टरांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत डॉक्टरांना पालिकेच्या वतीने मृत्युचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश देण्यात येणार आहे. हेही वाचा - राज्यात तापमानाचा पारा घसरला, मुंबईकरांना भरली हुडहुडी
First published: