• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • विक्रम गोखलेंना समर्थन देणाऱ्या विधानावरून अवधूत गुप्तेचा यू-टर्न, म्हणाला, 'ते पटेलच असं...'

विक्रम गोखलेंना समर्थन देणाऱ्या विधानावरून अवधूत गुप्तेचा यू-टर्न, म्हणाला, 'ते पटेलच असं...'

ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.

ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.

ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.

 • Share this:
    मुंबई, 20 नोव्हेंबर : भारताला स्वातंत्र्य भीकमध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut)  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर गायक अवधूत गुप्ते  (avadhoot gupte) यानेही विक्रम गोखले वडिलांसारखे असल्याचे सांगून समर्थन दिलं होतं. पण, आता अवधूतने या वादावर आपले स्पष्टीकरण देत यू-टर्न घेतला आहे. अवधूत गुप्तेनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून यावादावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या विधानाचा वेगळाच अर्थ काढला अस सांगत अवधूतने प्रसार माध्यमांवर खापर फोडले आहे. तसंच, 'ही मराठी चित्रपट सृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे. ह्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे. ह्याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंडवर करून सांगणे बरोबर ठरेल काय? असा सवाल उपस्थितीत करत गोखले यांच्या विधानाला आपले समर्थन नसल्याचे नमूद केले आहे. अवधूतची संपूर्ण FB पोस्ट आधी दुर्लक्षित करावे असे वाटले होते. पण, काही मित्र अजूनही नाराज आहेत असे वाटते, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम "मी ह्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत" असे सांगितले असता अधोरेखित शब्दांची जागा हेतूपुरस्सर बरोब्बर उलटी करुन, माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढणाऱ्या सर्व वृत्त संस्थांना मानाचा मुजरा. एवढेच सांगेन, की लोकांच्या प्रेमाचा हा ताजमहाल मी अतिशय कष्टाने कण-कण जमवून बांधला आहे. माझ्यासाठी त्यांचे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही हजार व्ह्यूजच्या क्षुल्लक स्वार्थासाठी प्लीज त्यावर दगड मारू नका! ही मराठी चित्रपट सृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे. ह्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक ‘मामा‘, विक्रम ‘काका‘ अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.  ह्याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंडवर करून सांगणे बरोबर ठरेल काय? त्यांच्या काळात त्यांनी नाटका पासून रुपेरी पडद्या पर्यंत आपल्या कलेने मराठी रसिक वर्ग घडवला आणि वाढवला, ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही आणि मराठी रसिकवर्ग ठरवूनही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही. ऐन लग्नसराईतच वाढणार रेडिमेड कपड्यांचे दर,5 टक्क्यांवरुन वाढून 12% होणार GST दर राहता राहिला हा संपूर्ण वाद ज्यामध्ये पडायची माझी अजिबात इच्छा नाही. ह्याचा अर्थ माझ्याकडे सजगता नाही, असा अजिबात होत नाही. पण, माझ्याकडे माझी स्वतःची संगीत आणि चित्रपट अशी चिरंतन टिकणारी माध्यमे असताना ह्या क्षणभंगुर समाज माध्यमांतून आणि वृत्तसंस्थाना काहीतरी विधाने देऊन मी का व्यक्त होऊ? आणि आजवर मी त्याच माध्यमातून व्यक्त होत आलेलो आहे.  चित्रपट "झेंडा" पासून "जात" गाण्यापर्यंत सर्व उदाहरणं तुमच्या समोर आहेत. बाकी, माझ्यावर आरोप करणाऱ्या मित्रांनी सांगावे, की ह्या बातमीवर जितक्या तत्परतेने प्रतिक्रिया दिलीत किंवा शेअर केलीत तितक्याच तत्परतेने माझे "जात" हे गाणे शेअर केले होते का? माझी खात्री आहे की माझ्या ह्या मित्रपरिवारातील ९९ टक्के माणसे ही अतिशय समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारी, माणुसकीला जपणारी अशीच सुसंस्कारी आहेत.  बाकीच्या मित्रांना एवढीच विनंती. की तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. ह्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या! काय म्हणाला होता अवधूत? कंगना रनौतच्या विधानाचे समर्थन केल्यामुळे विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पत्रकारांनी अवधुत गुप्तेला याच मुद्यावर प्रश्न विचारला असता अवधुतने वेगळाच सूर लगावला. 'माझा राजकारणाची संबंध नाही. इतक्यात काही बोलणार नाही. पण  विक्रम गोखले हे मोठे कलाकार आहे, आमच्या वडिलांच्या स्थानी आहे आम्ही त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वकच काही बोललं असेल. पण त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याइतका मी पात्र नाही. अंकिता लोखंडेच्या केळवणासाठी 'या' दोन मराठी अभिनेत्रींची स्पेशल तयारी तसंच, 'कंगनाने भारताला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, 2014 ला खरे स्वातंत्र मिळाले याबद्दल तुमची काय भूमिका आहे असं पत्रकारांनी विचारले असता, अवधुत गुप्ते म्हणाला की, विक्रम गोखले हे आमच्या वडिलांच्या स्थानी आहे, ते अतिशय मोठे विचारवंत आहे. त्यांच्या अभ्यास खूप मोठा आहे. त्यांना कलाकार म्हणून मर्यादा नाहीये, त्यांनी जे मत व्यक्त केले ते काही विचाराअंती असावे' असं गुप्ते म्हणाला होता.
  Published by:sachin Salve
  First published: