डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

डोंबिवलीतमध्ये भरदिवसा एका महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र दोन धाडसी तरुणांनी रिक्षेचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केलीये.

  • Share this:

18 आॅगस्ट : डोंबिवलीतमध्ये  भरदिवसा एका महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र दोन धाडसी तरुणांनी रिक्षेचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केलीये.

डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनीत राहणाऱ्या या महिलेनं स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. यावेळी शंकर विसलवाथ या रिक्षाचालकानं त्यांना स्टेशनला नेण्यास नकार दिला. पुढे गेल्यावर हाच रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहात थांबलेला दिसल्यानं त्या महिलेनं त्याला जाब विचारला. यावेळी शंकरनं त्या महिलेच्या मैत्रीणीला रिक्षेत खेचत रिक्षा पळवली.

यावेळी मनिषा त्या महिलेनं आरडाओरडा केल्यानं तिथून जाणाऱ्या दोन बाईकस्वारांनी रिक्षेचा पाठलाग करत या रिक्षाचालकाला पकडलं आणि त्या महिलेची सुटका केली. यानंतर त्याला रिक्षाचालकाला मानपाडा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर रिक्षाचालक शंकरला अटक करण्यात येणार आहे.

First published: August 18, 2017, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading