माणुसकीला काळीमा! फक्त पाच रुपयांसाठी हत्या; मुंबईत रिक्षाचालकाचा घेतला जीव

माणुसकीला काळीमा! फक्त पाच रुपयांसाठी हत्या; मुंबईत रिक्षाचालकाचा घेतला जीव

पाच रुपयांसाठी कोणी कोणाचा जीव घेईल या वर तुमचा विश्वास बसणार नाही. पण मुंबईत असं घडलंय. फक्त पाच रुपयांसाठी मुंबईत एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात वाद कुठे होत नाहीत. रेल्वे, बस, तिकिटाची रांग कुठेही. कारण मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावर पळत असतो. एखाद्या वेळी भांडण, क्वचित शिवागाळ अगदीच ताणलं गेलं तर थोडीशी हाणामारी होऊ शकते. पण पाच रुपयांसाठी कोणी कोणाचा जीव घेईल या वर तुमचा विश्वास बसणार नाही. पण मुंबईत असं घडलंय. फक्त पाच रुपयांसाठी मुंबईत एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

रामदुलार यादव हे 65 वर्षांचे रिक्षाचालक गॅस भरण्यासाठी बोरीवली पूर्वेकडील मागाठणे पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपावर गेले होते. सीएनजी गॅस भरून झाल्यानंतर रामदुलार याने येथील कर्मचाऱ्याला गॅसचे पैसे दिले. रामदुलार याने पाच रुपये कमी दिल्याचा पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याचा दावा होता. तर रामदुलार याने गॅस भरणाऱ्याकडे पाच रुपये कमी दिल्याचा दावा केला. यावरून रामदुलार आणि येथील कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालक रामदुलार यादव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी CCTV फुटेज जप्त केलं. पोलिसांनी संदीप जाधव, अक्षय मानकुंभरे, संतोष शेलार, संतोष जाधव आणि रविंद्र मानकुंभरे यांना अटक केली आहे.

हे जरूर वाचा : दिल्ली : नाव विचारलं आणि थेट 5 गोळ्या झाडल्या, तरुणाची हत्या

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल आता आपल्या हातात शोक किंवा संताप व्यक्त करण्याशिवाय काहीच नाही. पण असाच एकादा बाचाबाचीचा, वादावादीचा प्रसंग आपल्यावर येतो त्यावेळी आपण काय करतो हे सगळ्यांनी एकदा तरी आठवणं गरजेचं आहे.

आक्रमकपणाचे कारण काय?

सध्या मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये माणसं वेळेच्या आणि पैशांच्या मागे धावतात. अनेक अपेक्षांची कमीतकसी वेळेत पूर्तता करायची असल्याने माणूस सारका धावत असतो. वेळ, अपेक्षा आणि कामाचा ताण या सगळ्यात आपण संयम हरवून बसत आहोत असं मानससास्त्रज्ञांना वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 10:09 PM IST

ताज्या बातम्या