ठाण्यातील रिक्षा आणि टॅक्सी संपामध्ये फूट, संपामुळे ठाणेकरांचे हाल

ठाण्यातील रिक्षा आणि टॅक्सी संपामध्ये फूट, संपामुळे ठाणेकरांचे हाल

  • Share this:

25 मे :  ठाण्यात आयुक्तांनी केलेल्या कारवाईविरोधात रिक्षा संघटनांनी रिक्षा आणि टॅक्सी बंदची हाक दिलीय. मात्र या संपामध्ये आता फूट पडल्याचं चित्र दिसतंय. कारण शिवसेना आणि भाजपप्रणीत रिक्षा संघटना या संपातून बाहेर पडल्यात.

शहरात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. रिक्षाचालकांनी पुकारलेल्या सपांचा मोठा फटका ठाणेकरांना बसतो आहे. सकाळच्या घाईत अनेकांना ठाणे स्टेशन चालत गाठण्याची वेळ आली.

रिक्षाचालक बुधवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेल्याने ठाणेकरांचे हाल सुरू झाले आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर टीएमटी प्रशासन अधिकाधिक बसेस रस्त्यावर उतरवणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकाला केलेल्या कथित मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसह फेरीवाल्यांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. आयुक्तांसह पालिकेचे अन्य अधिकारी, बाउन्सरवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागी  ऑटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने केली होती. याबाबत सात दिवसांची वेळ देऊनही कुठलीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी बंद पुकारला आहे.

First published: May 25, 2017, 11:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading