रिक्षाचालकांची गुंडागर्दी, बसचालक आणि कंडक्टरला बेदम मारहाण

रिक्षाचालकांची गुंडागर्दी, बसचालक आणि कंडक्टरला बेदम मारहाण

  • Share this:

10 जून : नवी मुंबईतल्या घणसोलीमध्ये मुजोर रिक्षा चालकांनी बस चालक आणि कंडक्टला बेदम मारहाण केलीय. एनएमएमटीचे बस चालक फैय्याज पठाण यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा बाजूला घेण्यास सांगितलं. त्यानंतर रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर वाद सुरू केला.

या वादानंतर रिक्षा चालकांनी  बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीत फैय्याज पठाण किरकोळ जखमी झालेत.तर या प्रकरणी मारहाण करणारे दोन रिक्षाचालक दादा आणि राजा यांना पोलिसांनी अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading