कट मारल्याच्या वादातून रिक्षा चालकानं बाईकस्वाराला उडवलं, पाहा मुंबईतील अपघाताचा थरारक VIDEO
बाईकस्वाराचे नशीब बलवत्तर म्हणुन तो बचावला नाही तर मागून येणारी गाडीची धडक लागून तो बाईकस्वार गंभीर जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकलाा असता.
मुंबई, 24 डिसेंबर : वेळ आणि काळ कधी आणि कुठे कसा येईल याचा काही नेम नाही. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील एका अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईतील शिवाजीनगर भागातील महामार्गावरून जात असताना एका दुचाकीस्वाराचा रिक्षा चालकासोबत वाद झाला. या वादाचं रुपांतर हत्येच्या प्रयत्नापर्यंतचं गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कट मारल्याच्या रागातून दुचाकीस्वारानं रिक्षा चालकाला जाब विचारला. तिथे दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. भांडण मिटवून दोघंही आपापल्या मार्गानं निघाले असताना मुजोर रिक्षा चालकानं भांडलेल्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. बदल्या आणि सूडाच्या भावानेनं भांडणाचा राग दुचाकीस्वारावर काढणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कट मारल्याचा जाब विचारणाऱ्या बाईकस्वाराला मुजोर रिक्षाचालकानं उडवलं, पाहा मुंबईतील अंगावर शहारे आणणारा थरारक VIDEO pic.twitter.com/TtZ3oA4TRv
मुजोर रिक्षा चालकानं मारलेली ही धडक जीवघेणी होती. पण बाईकस्वाराचे नशीब बलवत्तर म्हणुन तो बचावला नाही तर मागून येणारी गाडीची धडक लागून तो बाईकस्वार गंभीर जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकलाा असता. रिक्षावाल्यानं ही धडक सूडाच्या भावनेतून दिल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
ही धक्कादायक घटना साधारण 17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता घडल्याचं सांगितलं जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचा नंबर शोधला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या व्हिडीओमधून रिक्षावाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली असून यावेळेस ती नागरिकांच्या जीवावर बेतली असती. त्यात ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या शिवाजीनगर भागात अवैध रिक्षावाल्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे पोलीस या रिक्षा चालकांच्या मुजोरीला लगाम घालणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.