S M L

शुल्लक कारणांवरून 20 वर्षाच्या रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या!

उल्हासनगरमध्ये एका रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

Updated On: Sep 11, 2018 12:33 PM IST

शुल्लक कारणांवरून 20 वर्षाच्या रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या!

उल्हासनगर, 11 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये एका रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या नेवळी बदलापूर महामार्गाशेजारी असलेल्या अश्विनी हॉटेल हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संतोष जुबले असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याच्या या हत्येने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार संशयितांवर हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर त्यातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. सन्नी लक्ष्मण सपकाळ (30 ), गणेश बलराज सुनके (33 ),किरण नरेंद्र मांडवकर (24 )अशी या तीन आरोपींची नावं आहेत.

दरम्यान, ही हत्या का करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे. पण किरकोळ कारणावरून हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी संतोषचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पण आपल्या तरुण मुलाच्या अशा हत्येनं जुबले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जातेय. तर या प्रकरणात अटक केलेल्या तीन जणांची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2018 12:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close