मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

औरंगाबादमधील पोलिसाचा ठाण्यात मृत्यू, फूटपाथवर आढळला मृतदेह

औरंगाबादमधील पोलिसाचा ठाण्यात मृत्यू, फूटपाथवर आढळला मृतदेह

Representative Image

Representative Image

Constable found dead in Thane: ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे.

  • Published by:  Sunil Desale
ठाणे, 29 जुलै: औरंगाबादमधील (Aurangabad) एका पोलीस कॉन्स्टेबलचा ठाण्यात मृतदेह (Police Constable dead) आढळून आला आहे. ठाण्यातील (Thane) फूटपाथवर बुधवारी मृतदेह आढळून आला आहे. चक्क पोलीस कर्मचारीच फूटपाथवर मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बळीराम मोरे असे असून ते 40 वर्षांचे होते. बळीराम मोरे हे ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील एका फूटपाथवर आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितले. संतापजनक! 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; मग गुप्तांगावर वार करत मानही मोडली अन्... पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, बळीराम मोरे हे औरंगाबाद येथील पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बळीराम मोरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते सीक लिव्हवर होते. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या बिट मार्शल टीममधील पोलीस नाईक महाले आणि थविल यांना बळीराम मोरे हे फूटपाथवर आढळून आले होते. दरम्यान बळीराम मोरे हे रजेवर असल्याने ते ठाण्यात कसे आले आणि फूटपाथवर त्यांचा मृतदेह कसा आढळून आला हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.
First published:

Tags: Crime, Thane

पुढील बातम्या