मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

औरंगाबाद विमानतळाचे नाव आता 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ'!

औरंगाबाद विमानतळाचे नाव आता 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ'!

तर कोल्हापूर विमानतळाचे नाव 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर' असं करण्यात आलं आहे.

तर कोल्हापूर विमानतळाचे नाव 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर' असं करण्यात आलं आहे.

तर कोल्हापूर विमानतळाचे नाव 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर' असं करण्यात आलं आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 मार्च : औरंगाबाद  विमानतळाच्या नामांतराला महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद' असं करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री म्हणाले की,  'विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असं नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसंच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल'.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई' असं करण्यात आलं आहे. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर' असं करण्यात आलं आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपनेही महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी औरंगाबाद विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे. तसंच, औरंगाबाद विमानतळ नाव बदललं  हे चांगलेच आहे. आज विमानतळाच्या नावाला जशी मान्यता दिली पण शहराच नाव कधी करणार त्यावरून पळ काढता येणार नाही, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

First published: