• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नगरसेविकेच्या कार्यालयात बलात्काराचा प्रयत्न, पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या BJP च्या ताईंचा फोन आता बंद - महापौर कडाडल्या

नगरसेविकेच्या कार्यालयात बलात्काराचा प्रयत्न, पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या BJP च्या ताईंचा फोन आता बंद - महापौर कडाडल्या

BMC Mayor Kishori Pednekar on woman allegedly sexually harrased in BJP Corporator office: भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, आता भाजपचे लोक आहेत कुठे ? महापौरांचा सवाल

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील नगरसेविकेच्या (Mumbai BJP Corporator) कार्यालयात एका महिलेचा विनयभंग करुन बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गप्प का? भाजपच्या महिलांची आता ताईगिरी गेली कुठे? असा सवालही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? दरवेळेला राज्याला बदनाम केलं जातं. मी काही तरी वेगळं करते असे ताईगिरी दाखवता, पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गुपचिळी का? ताईगिरी करत होत्या त्यांचा फोन आता बंद असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Kishori Pednekar on BJP) नेमकं काय आहे प्रकरण? मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर भाजप कार्यकर्त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करुनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर आता बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. बलात्कार पीडित चिमुकलीचं मोठं धाडस; कोर्टात वाचला अत्याचाराचा पाढा, नराधमाला जन्मठेप मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला एक समाजसेविका आहे. ही महिला भाजपच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती त्यावेळी आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात गेली असता आरोपीने कार्यालय बंद करुन पीडित महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. दिल्लीतील निर्भया प्रकारासारखीच मुंबईत घटना मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एक टेम्पोत महिलेवर बलात्कार झालेल्या बलात्कारानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या शेजारील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन सर्वप्रथम घटनेची माहिती दिली. रात्री 3.20 मिनिटांनी कंट्रोल रूमला फोन आला आणि 10 मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या कपड्यांवर रस्ताचे डाग आढळून आले आहेत. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे.मोहन चौहान हा उत्तरप्रदेशच्या जौनपूरचा रहिवासी आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: