मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Video: कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिसाला उडवलं; कारच्या बोनेटवरून नेलं फरफटत

Mumbai Video: कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिसाला उडवलं; कारच्या बोनेटवरून नेलं फरफटत

विरूध्द दिशेने येणाऱ्या कारच्या चालकाने कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गादेकर हे गाडीच्या बोनेटवर अडकून पडले. मात्र, चालकाने कार अजिबात थांबवली नाही

मुंबई, 09 जुलै : रस्त्यावर वाहतूक पोलीस पाहिल्यानंतर अनेकजण घाबरतात. मात्र, काही महाभाग आपल्याच तोऱ्यात असतात, ते नियमही मोडतात आणि दुसऱ्याच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील खारघर कोपरा भागात घडला (Mumbai crime) आहे.

खारघर वाहतूक शाखा नवी मुंबई येथील (Traffic police Mumbai) वाहतूक पोलीस गादेकर हे कोपरा ब्रीज या ठिकाणी विशेष कारवाईसाठी तैनात होते. रस्त्याच्या विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनावरती कारवाई करण्यासाठी ते पुढे गेले आणि कार चालकाला थांबण्यास सांगितले. मात्र, विरूध्द दिशेने येणाऱ्या कारच्या चालकाने कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गादेकर हे गाडीच्या बोनेटवर अडकून पडले. मात्र, चालकाने कार अजिबात थांबवली नाही आणि ते गाडीवर लटकत राहिले. लटकत्या अवस्थेत गाडी तशीच चालू राहिल्याने जीव मुठीत धरून ते पडून राहिले होते.

ही धक्कादायक घटना त्या गाडीच्या पाठीमागे असलेल्या वाहनातील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ कोणालाच काय करावे कळत नव्हते. शेवटी प्रसंगावधान राखत गादेकर यांच्या साथीला असलेले पोलीस नाईक निवृत्ती नाईक यांनी दुसऱ्या गाडीच्या मदतीने या कारचा पाठलाग करून कार चालकास ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीला खारघर पोलीस ठाण्यात आणले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai Poilce