Home /News /mumbai /

'सिल्वर ओक'वरील आंदोलन प्रकरण; 109 आंदोलकांना मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

'सिल्वर ओक'वरील आंदोलन प्रकरण; 109 आंदोलकांना मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

'सिल्वर ओक'वरील आंदोलन प्रकरण, 109 आंदोलकांना मोठा झटका

'सिल्वर ओक'वरील आंदोलन प्रकरण, 109 आंदोलकांना मोठा झटका

ST employees protest: एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर 8 एप्रिल रोजी हल्ला केला. यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 110 जणांना अटक करण्यात आली आहे.

    मुंबई, 9 एप्रिल : एसटी कर्मचारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक (Silver Oak) बाहेर जमा झाले. यानंतर या आंदोलकांनी थेट दगडफेक आणि चप्पलफेक करत शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांच्यासह एकूण 110 जणांना अटक केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर 109 आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 109 आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांच्या जामीनाचा अर्ज मोकळा झाला होता. त्यांनी जामीनासाठी अर्ज सुद्धा केला मात्र, त्यांचा हा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यामुळे आता वरच्या कोर्टात या आंदोलनकर्त्यांना अर्ज करावा लागणार आहे. उद्या रविवार असल्याने सोमवारीच आता त्यांना जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली. मात्र, कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे आहेत. गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज किला कोर्टाने फेटाळला असून त्यांना वरच्या कोर्टात जामीन अर्ज करण्याकरता मुभा दिली आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर सदावर्ते यांच्याबाजूने तब्बल 7 वकिलांची फौज उभी होती. वाचा : 'सिल्वर ओक'वरील आंदोलन प्रकरण, पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड प्रदीप घरत यांचा युक्तिवाद FIR वाचत दाखवत सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. काही व्यक्तींच्या चिथावणी खोर वक्तव्यांमुळे आंदोलन केले जाणार होते. रॉयल स्टोन येथे देखील आंदोलन होणार होते. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केली जाणार होती, अशी माहिती घरत यांनी कोर्टात दिली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून महेश वासवानी यांचा युक्तिवाद मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली त्याबद्दल युक्तीवाद सदावर्ते यांनी केला. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची. आज सादर केलेल्या FIR मध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत. बारामतीला जाऊन आंदोलन करणार असं बोलले होते. घरात घुसून असं सदावर्ते कधीच बोलले नाही. असं वक्तव्य प्रसार माध्यमांवर केलंय असं पोलीस म्हणत आहे, पण एकाही प्रसार माध्यमांवर असं वक्तव्य दिसलेच नाही, असा दावा वासवानींनी केला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai police, Sharad Pawar (Politician), St bus

    पुढील बातम्या