S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

कुर्ल्यात अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा तरूण अटकेत

17 ऑक्टोबरला ही घटना घडली आहे.कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका तरूणाने हल्ला केला होता. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे.17 ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारासही घटना घडली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 07:51 PM IST

कुर्ल्यात अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा तरूण अटकेत

मुंबई,21ऑक्टोबर: मुंबईतमुली सुरक्षित असतात असं म्हटलं जातं.पण मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आज कुर्ल्यात घडली आहे. एका मुलीवर एका तरूणाने हल्ला केला आहे.

17 ऑक्टोबरला ही घटना घडली आहे.कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका तरूणाने हल्ला केला होता. या तरूणाचं नाव इम्रान असं सांगण्यात येतं आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात या मुलाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.या तरूणाला  पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे.17 ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारासही घटना घडली आहे. भर चौकात इम्रान या तरूणाने पीडितेला मारहारण केली होती. दरम्यान हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.ती मुलगी या हल्ल्यात जखमी झाल्याचंही फुटेजमध्ये दिसून येतंय. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close