• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नवी मुंबईत BJP नगरसेविकेसह पतीवर कार्यालयात घुसून प्राणघातक हल्ला

नवी मुंबईत BJP नगरसेविकेसह पतीवर कार्यालयात घुसून प्राणघातक हल्ला

BJP corporator Attack: नवी मुंबईत (Navi Mumbai) भाजप नगरसेविकेवर प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची बातमी समोर येतेय.

 • Share this:
  नवी मुंबई, 28 जून: नवी मुंबईत (Navi Mumbai) भाजप नगरसेविकेवर (BJP corporator) प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची बातमी समोर येतेय. नगरसेविकेसोबत तिच्या पतीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. कौपरखैरणेमध्ये (kopar khairane) ही धक्कादायक घटना घडली आहे. भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न झाला असल्याचं समजतंय. कोपरखैरणे सेक्टर 6 मधील कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला. रि्व्हॉल्वर आणि कोयत्यानं आरोपींनी हल्ला केला. हेही वाचा-मुंबईकरांनो; आजपासून असे असतील नियम, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा दोन अज्ञात आरोपी संगिता म्हात्रे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याचे वार करण्यात आले. आरोपींकडून हल्ला होताच दोघांनीही आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. तर दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले संदीप म्हात्रे यांच्यावर नवी मुंबई पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून कौपरखैरणे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: