विक्रोळीत विवाहित महिलेवर चाकूहल्ला,आरोपी अटकेत

विक्रोळीत विवाहित महिलेवर चाकूहल्ला,आरोपी अटकेत

विक्रोळीमध्ये काम करत असलेल्या सत्तावीस वर्षाच्या विवाहित महिलेच्या कार्यालयामध्ये घुसून तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सावीर हसन मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो वाकोला इथे राहतो.

  • Share this:

मुंबई, 22 आॅक्टोबर : विक्रोळीमध्ये काम करत असलेल्या सत्तावीस वर्षाच्या विवाहित महिलेच्या कार्यालयामध्ये घुसून तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सावीर हसन मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो वाकोला इथे राहतो. आरोपी आणि या महिलेची जुन्या कार्यालयात ओळख झाली होती.

एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅक मेल करुन वारंवार बलात्कार करत होता. शनिवारी साबीर हा या महिलेच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला तिने ऑफिसच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर, हातावर तेहत्तीस टाके पडले आहेत.

रात्री उशिरापर्यंत महिलेचा जबाब नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू होती.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2017 03:45 PM IST

ताज्या बातम्या