News18 Lokmat

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला तरुणांची धक्काबुक्की

उल्हासनगरमध्ये टोईंगच्या वादातून वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आलीय. या प्रकरणी 2 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गाडी टो करण्याच्या वादातून उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातला हा सगळा प्रकार टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2017 12:41 PM IST

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला तरुणांची धक्काबुक्की

02 डिसेंबर : उल्हासनगरमध्ये टोईंगच्या वादातून वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आलीय.  या प्रकरणी 2 तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गाडी टो करण्याच्या वादातून उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातला हा सगळा प्रकार टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केलाय.

काल संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास उल्हासनगर स्टेशनच्या पूर्व भागात वाहतूक कोंडी झाल्यानं टोईंग व्हॅनने अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्या अनाऊन्समेंट करून उचलायला सुरुवात केली. मात्र यावेळी विशाल आढाव आणि गणेश लष्करे या दोन तरुणांनी त्यांची उचललेली गाडी जबरदस्तीने ओढून खाली घेतली. यावेळी टोईंग व्हॅनवर उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा राग आल्यानं या दोघांनी सुळ यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. तसंच आता तुझी वाट लावतो तुमची औकात काय आहे? अशी अपमानजनक भाषा वापरली.

यानंतर वाहतूक पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलिसांना पाचारण करत या दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...