ठाणे रेल्वे स्थानकावर बाळाचा जन्म,बाळ-बाळंतीण सुखरूप

ठाणे रेल्वे स्थानकावर बाळाचा जन्म,बाळ-बाळंतीण सुखरूप

25 वर्षाची जान्हवी जाधव ही बदलापूरची रहिवासी असून तिने प्लॅटफॉर्मवरच बाळाला जन्म दिला.

  • Share this:

22 जून : ठाणे रेल्वे स्थानकावर एका गर्भवतीने बाळाला जन्म दिला. प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर महिलेची प्रसुती झाली. पोलीस आणि प्रवाशांच्या सहकार्याने ही प्रसुती सुखरुप पार पडली.

25 वर्षाची जान्हवी जाधव ही बदलापूरची रहिवासी असून तिने प्लॅटफॉर्मवरच बाळाला जन्म दिला. महिला पोलिस कॉन्स्टेबल शोभा मोटे, प्रवासी नर्स आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीनं या महिलेची प्रसुती झाली.

बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

First published: June 22, 2017, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading